Himachal Pradesh Politics | हिमाचलमध्ये भाजपने काँग्रेसला दिलं नवं टेन्शन; राज्यसभा निवडणुकीत आपला उमेदवारच केला उभा | Navarashtra (नवराष्ट्र)

0
21
Himachal Pradesh Politics | हिमाचलमध्ये भाजपने काँग्रेसला दिलं नवं टेन्शन; राज्यसभा निवडणुकीत आपला उमेदवारच केला उभा | Navarashtra (नवराष्ट्र)


हिमाचलमध्ये भाजपने काँग्रेसला दिलं नवं टेन्शन; राज्यसभा निवडणुकीत आपला उमेदवारच केला उभा

हिमाचल प्रदेशात राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार नाही. विरोधी पक्ष भाजपने मोठा डाव खेळत राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवार उभा केला आहे. भाजपने काँग्रेसमधून आलेल्या हर्ष महाजन यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

शिमला : हिमाचल प्रदेशात राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार नाही. विरोधी पक्ष भाजपने मोठा डाव खेळत राज्यसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवार उभा केला आहे. भाजपने काँग्रेसमधून आलेल्या हर्ष महाजन यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांचा सामना काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अभिषेक मनु सिंघवी यांच्याशी होणार आहे.

विधानसभेत काँग्रेसचे बहुमत असल्याने भाजप उमेदवार देणार नाही, असे मानले जात होते. 2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी हर्ष महाजन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. हर्ष महाजन हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहिले आहेत. काँग्रेस सरकारमध्ये ते मंत्रीही राहिले आहेत. हर्ष महाजन हे माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांच्या जवळचे आहेत.






Source link