
अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, जमीलाच्या पतीने खोटी केस टाकून तिला अटक केली होती. अटक करताना पोलिसांनी बुरखा न काढल्यास जमीलावर खटला भरण्याची धमकी दिली. अरवा यांनाही एका खोट्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. आरोप आहे की, जेव्हा त्यांचा बुरखा काढून फोटो घेतले जात होते तेव्हा तेथे ३० हून अधुक पुरुष कैदी उपस्थित होते. ते अरवाला पाहत होते. यामुळे अरवाच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. त्यांच्या वकीलांनी सांगितले की. एखाद्याला धार्मिक कपडे काढण्यास मजबूर करणे कपडे काढून झडती घेण्यासारखे आहे. ५ एप्रिल रोजी आर्थिक नुकसान भरपाईची मागणी करणारी याचिका दाखल केली होती. मॅनहट्टन न्यायालयाने मंजूर केली आहे. क्लार्क आणि अझीझ यांचे वकील अल्बर्ट फॉक्स कॅन यांच्या मते, हा तोडगा न्यूयॉर्ककरांच्या धार्मिक आणि गोपनीयतेच्या हक्कांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.