
न्यायालयाच्या निकालावर सोशल मीडियावर प्रतिक्रिया –
न्यायालयाच्या या निकालावर सोशल मीडियावर याच्या खूप चर्चा होत आहेत. यावरून खूप प्रतिक्रिया येत आहेत. अधिकांश लोकांनी न्यायालयाच्या या निकालाचे स्वागत केले आहे. एका यूजरने म्हटले की, महिला कर्मचाऱ्यांना प्रत्येक महिन्याला २ ते ३ दिवस मासिक धर्म सुट्टी मिळेल. अशा प्रकारच्या सुट्टीचे महत्व समजल्याबद्दल सिक्किम हायकोर्टाचे अभिनंदन. अन्य एका यूजरने लिहिले की, हा निर्णय पूर्णपणे चांगला नाही, अर्धाच चांगला आहे. अखेर कोणतीही महिला या सुट्टीसाठी स्वयं प्रमाणित का करू शकत नाही. अखेर येथे एखाद्या डॉक्टरची गरज का आहे.