High Court News : अविवाहित मुलीलाही वडिलांकडून पोटगीचा अधिकार; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय

0
14
High Court News : अविवाहित मुलीलाही वडिलांकडून पोटगीचा अधिकार; नागपूर खंडपीठाचा महत्वपूर्ण निर्णय


पोटगी हा शब्द बहुतांश विवाहित महिलांच्या प्रकरणामध्ये वापरला जातो. मात्र अविवाहित मुलगीही पोटगीस पात्र असून, तिच्या वडिलांकडून अविवाहित मुलीला पोटगी घेण्याचा अधिकार आहे, अशा कौटुंबिक न्यायालयाच्या महत्त्वाच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शिक्कामोर्तब केले. मुलगी पूर्णपणे स्वावलंबी किंवा तिचं लग्न होत नाही तोपर्यंत वडिलांकडून तिला पोटगी म्हणजेच पालनपोषणाचा खर्च मिळण्याचा हक्क आहे, असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं एका प्रकरणात दिला आहे. 



Source link