त्याचबरोबर सात तासांच्या चौकशीनंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केली आहे. सोरेन यांच्या चौकशीनंतरही त्यांच्या उत्तराने ईडीचे समाधान झाले नसल्याने त्यांना अटक करण्यात आली. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर मुख्यमंत्री निवासस्थान, राजभवन, भाजप कार्यालयासोबतच रांचीमधली सुरक्षा वाढवण्यात आली आहे. रांचीच्या अनेक भागांमध्ये कलम १४४ लागू करण्यात आलं आहे.








