फलटणः बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धम्मर्यांचा आनंदाचा व उत्साहाचा सण आहे. हा सण जगभरात विशेषतः भारतात वैशाखी पोर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म, ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीनही घटना झाल्या आहेत. आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी धम्म सिद्धांतामुळे तथागत बुद्धांना जगातील महापुरुषानी गुरू मानले .आहे बौद्ध धम्मयांची मोठ्या प्रमाणावर संख्या असणाऱ्या चीन, जपान, व्हियेतनाम, थायलंड, भारत, म्यानमार, श्रीलंका, सिंगापूर, अमेरिका, कंबोडिया, मलेशिया, नेपाळ, इंडोनेशिया या देशांसह सुमारे १८० देशांतील बौद्ध लोक हा सण उत्साहात साजरा करतात.
फलटणः तथागत भगवान गौतम बुद्ध यांची २५८६वी जयंती महोत्सव फलटण शहरामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव व साहस क्रिडा मंडळ द्वारा आयोजित सालाबाद प्रमाणे यावर्षी मोठया आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आला यामध्ये फलटण शहरातील व पंचक्रोशीतील सर्व बौद्ध उपासक व उपासिका तसेच अनेक मान्यवरणी डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात उपस्थिती राहुन तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले
तथागत भगवान गौतम बुद्ध जयंतीच्या मध्यरात्री डॉ. बाबासाहेब आंबडेकर चौक येथे हजारो उपासक उपासिका यांनी सामूहिक त्रिशरण पंचशील घेऊन भगवान बुद्धांना अभिवादन आणि वंदन करण्यात आले. यानिमित्ताने चौकात बुद्धांची मूर्ती असलेली भव्य देखावा आणि आकर्षक सजावट करण्यात आली होती.
तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सवानिमित्त मंगळवार पेठ व महात्मा फुले नगर (म्युनिसिपल कामगार वसाहत येथील महिलांच्या लेझीम संघ तयार करून लेझीम पथक सादरीकरण जयंतीच्या मिरवणूकी मध्ये केले होते तसेच फलटण शहरातील विविध ठिकाणी अन्नदान व खिर दान करण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते . मंगळवार पेठ येथील मंडळ ने अन्नदान केले तसेच तथागत गौतम बुध्द यांच्या २५८६व्या जयंतीनिमित्त फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे अभिवादन केले.
यावेळी गटनेते अशोकराव जाधव, आरपीआय जिल्हासचिव विजय येवले, माजी नगरसेवक मधुकर काकडे, संजय निकाळजे, माजी नगरसेवक सचिन अहिवळे, विकास काकडे, सुनिल घोलप, महेश जगताप, अॅड. प्रसाद काकडे, विशाल पाटील, अमोल अहिवळे, गणेश बिराडे, विशाल काकडे, गौतम काकडे, जाधव, तेजस दत्ता भोसले, संदिप काकडे, रमेश जाधव,सतिश साळवे, बापु भोसले, प्रविण शेळके, प्रविण कांबळे, विजय घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.
आपले मानबिंदू यांच्या उपस्थितीत तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव मिरवणूकीच्या प्रारंभ केला
आयु. तुषार शांताराम मोहिते साहेब (आयकर सह आयुक्त, मुंबई (भारत सरकार) IRS)
आयु. अनिल आबाजी अहिवळे (निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, मुंबई) आयु. प्रसाद मधुकर काकडे (असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर ग्रुप ए) सौ. शितल किरण अहिवळे (भोसले )(असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्यूटर ग्रुप ए) आयु. अजय सुनील मिसाळ (पोलिस उप निरीक्षक)आयु. शंकेश्वर हनुमंत अहिवळे (राज्य कर निरीक्षक)आयु. सागर राहुल अहिवळे (असि. लॉ ऑफिसर, पनवेल) आयु. अनिकेत दीपक काकडे (राज्य कर निरीक्षक)आयु. सनी संजय अहिवळे (मा. नगरसेवक) आयु. सचिन रमेश अहिवळे (मा. नगरसेवक)आयु. वैशाली सुधीर अहिवळे (मा नगरसेविका ) यांच्या प्रमुख उपस्थितीत
या मिरवणुकी मध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा महान चक्रवर्ती सम्राट अशोक यांची प्रतिमा तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई याच्या प्रतिमा तसेच रथामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध मूर्ती सहा ट्रॉली महिला लेझीम पथक मुरूम येथील लेझीम पथक तसेच झाज पथक व डीजे सह आकर्षक सजावट करून पंचशील मंगळवार पेठ येथून मिरवणूकीची सुरवात करुण विविध भागातून ही मिरवणूक काढण्यात आली मुसळधार पाऊस ही रोखू शकला नाही भीम सैनिकांचा जोश..बुद्ध जयंती उत्साहात साजरी..
वादळ वारा व पाऊस यामुळे तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सवाच्या मिरवणूकीत अडथळा निर्माण झाला आणि मिरवणूक रात्री थांबविण्यात आली आणि सर्वांच्या आनंदावर पाणी पडले पण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी मागे सरतील ते अनुयायी कसले,पुन्हा नव्या जोमान जयंती मंडळाच्या कार्यकर्ते नी आणि बौद्ध उपासक व उपासिक यांनी अफाट इच्छा शक्तीच्या जोरावर २४ / ५ /२०२४ रोजी सकाळी २४ वर्षातील पाहिली बुद्ध जयंतीची मिरवणूक अतिशय उत्साहवर्धक आनंदीमय वातावरण निर्माण करून अतिशय सुंदर अशी मिरवणूक फलटण शहरातून काढून फलटण शहरात बुद्धमय वातावरण तयार केले