
बारामती (प्रतिनिधी) : बारामती शहरातील उत्कर्षनगर परिसरातील प्रलंबित प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष राज कुमार व बाळासाहेब चव्हाण यांनी ओढ्याच्या साचलेल्या पाण्यात अर्धे बुडून आमरण उपोषण सुरू केले. या अनोख्या आंदोलनाने परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले आहे.
प्रमुख मागण्यांमध्ये उत्कर्षनगर येथील ओढ्यातील पाणी विसर्ग करणे, बारामतीत वाढत्या डेंग्यू सदृश्य रुग्णांवर नियंत्रण आणणे, पी. टी. गांधी यांनी केलेल्या अतिक्रमणांचे हटविणे तसेच उत्कर्षनगरकडे जाणाऱ्या ओढ्यावर कायमस्वरूपी पूल बांधण्याचा समावेश आहे.
या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक, महिला आणि शाळकरी मुले मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला.






