GT vs DC : गुजरातसमोर दिल्लीचे आव्हान; नाणेफेक जिंकत पंतचा गोलंदाजी करण्याचा निर्णय | पुढारी

0
16
GT vs DC : गुजरातसमोर दिल्लीचे आव्हान; नाणेफेक जिंकत पंतचा गोलंदाजी करण्याचा निर्णय | पुढारी


पुढारी ऑनलाईन डेस्क : गुजरातविरूद्धच्या सामन्यात दिल्लीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या जागी सुमित कुमारला संधी मिळाली आहे. तर गुजरातने आपल्या संघात बदल करत ऋद्धिमान साहा आणि डेव्हिड मिलर यांचा प्लेइंग 11 मध्ये समावेश केला आहे. यासह पदार्पणाच्या सामन्यात संदीप वारियरला उमेश यादवच्या जागी संघात स्थान मिळाले आहे. (GT vs DC)

दोन्ही संघांचे प्लेइंग 11

दिल्ली कॅपिटल्स : पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, ट्रिस्टन स्टब्स, शाई होप, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, इशांत शर्मा, मुकेश कुमार, खलील अहमद.

इम्पॅक्ट प्लेयर : अभिषेक पोरेल, लिझाद विल्यम्स, कुमार कुशाग्रा, प्रवीण दुबे, ललित यादव.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), रिद्धिमान साहा (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, अभिनव मनोहर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर.

इम्पॅक्ट प्लेयर : शरथ बीआर, मानव सुथार, शाहरुख खान, रविश्रीनिवासन साई किशोर, दर्शन नळकांडे.

हेही वाचा :





Source link