Gold Smuggling | भारतात सोन्याची तस्करी वाढतीये; चोरीचे तब्बल दोन हजार किलो सोने जप्त | Navarashtra (नवराष्ट्र)

0
28
Gold Smuggling | भारतात सोन्याची तस्करी वाढतीये; चोरीचे तब्बल दोन हजार किलो सोने जप्त | Navarashtra (नवराष्ट्र)


भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोने आयातदारांपैकी एक आहे. पारंपारिकपणे, भारतात सोने (Gold in India) ही सुरक्षित गुंतवणूक पद्धत मानली जाते. सणासुदीच्या काळात किंवा लग्नसमारंभात ते खरेदी करून भेट म्हणून देणे शुभ मानले जाते.

नवी दिल्ली : भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोने आयातदारांपैकी एक आहे. पारंपारिकपणे, भारतात सोने (Gold in India) ही सुरक्षित गुंतवणूक पद्धत मानली जाते. सणासुदीच्या काळात किंवा लग्नसमारंभात ते खरेदी करून भेट म्हणून देणे शुभ मानले जाते. अलीकडे सोन्याच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाली आहे. अशातच भारतात सोन्याची तस्करी मोठ्या प्रमाणात (Gold Smuggling) वाढली आहे.

देशात चोरीचे तब्बल 2000 किलो सोने जप्त करण्यात आले आहे. 2022 मध्ये भारताने 35 अब्ज डॉलरचे सोने आयात केले होते. भारतीय चलनात ही किंमत 2,91,060 कोटी रुपये आहे. कच्च्या तेलानंतर (पेट्रोलियम) भारताचे सर्वाधिक आयात बिल सोन्याचे आहे. सोन्याची आयात कमी करण्यासाठी सरकारने ‘सार्वभौम सुवर्ण रोखे’ सारखी योजनाही आणली आहे, पण परिस्थिती अशी आहे की मागणी पूर्ण करण्यासाठी देशात सोन्याची तस्करीही मोठ्या प्रमाणात होत आहे.






Source link