Gokul Milk Rate : ‘गोकुळ’च्या दूध दरात वाढ, मुंबईसह पुणेकरांना आता किती रुपये मोजावे लागणार?

0
1
Gokul Milk Rate : ‘गोकुळ’च्या दूध दरात वाढ, मुंबईसह पुणेकरांना आता किती रुपये मोजावे लागणार?


गोकुळकडून गाईच्या दुधामध्ये प्रति लिटर दोन रुपयांनी वाढ करण्यात आल्याचे जाहीर केलं आहे. या दरवाढीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे,  मात्र सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडणार आहे. गायीच्या दुधात प्रति लिटर दोन रूपये दरवाढ केली आहे. या पुढे मुंबई आणि पुण्यात गोकुळचे गायीचे दूध प्रतिलिटर ५४ रूपये ऐवजी ५६ रूपयांनी मिळेल. ही दरवाढ फक्त मुंबई आणि पुण्यासाठी लागू असणार आहे. अशी माहिती गोकुळ संघाचे अध्यक्ष अरूण डोंगळे यांनी दिली आहे. 



Source link