Ganpati Special Train : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, कोकणात जाण्यासाठी २२ डब्यांच्या रेल्वेगाड्या

0
17
Ganpati Special Train : चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, कोकणात जाण्यासाठी २२ डब्यांच्या रेल्वेगाड्या


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील सीएसटी ते मडगाव आणि सीएसटी ते सावंतवाडी या दोन्ही गणपती विशेष रेल्वेगाड्यांमध्ये प्रत्येकी दोन डब्यांची वाढ करण्यात येत असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. कोकणात जाणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांची बुकिंग फुल्ल झाली असून वेटिंग लिस्ट अद्यापही शेकडोंच्या घरात आहे. त्यामुळं प्रवाशांचे आणखी हाल होऊ नये, यासाठी रेल्वेने कोकणात जाणाऱ्या रेल्वेंना अधिकचे दोन डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं मुंबई-मडगाव आणि मुंबई-सावंतवाडी रोड या रेल्वेतील डब्यांची संख्या २० हून २२ वर पोहचणार आहे.



Source link