
१४ सप्टेंबर पासून मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. महामंडळाकडून कोकण मार्गावरसोडल्या जाणाऱ्या ३१०० बसेसपैकी आज अखेर १७०० बसेसचे गट आरक्षण पूर्ण झाले आहे. गट आरक्षणामध्ये तिकिट दरात अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के सवलत दिली जात आहे.






