Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवासाठी कल्याणवरून कोकणात जाण्यासाठी एकही विशेष रेल्वेगाडी नाही; कोकणवासीयांचा संताप

0
15
Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवासाठी कल्याणवरून कोकणात जाण्यासाठी एकही विशेष रेल्वेगाडी नाही; कोकणवासीयांचा संताप


गणेशोत्सवासाठी केवळ २ आठवड्यांचा अवधी शिल्लक असल्याने कोकणात जाणाऱ्यांची लगबग सुरू झाली आहे. मात्र बहुतांश रेल्वे प्रवाशांची तिकीटे प्रतीक्षा यादीत असल्याने, प्रवासी हवालदिल झाले आहेत. त्यामुळे प्रवासी जादा गणपती विशेष गाड्यांच्या प्रतीक्षेत आहेत. तर, ज्या रेल्वेगाड्या त्यापैकी एकही रेल्वेगाडी ही कल्याणवरून धावत नाही. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. कल्याण, शहाड, टिटवाळा, बदलापूर, अंबरनाथ या पट्ट्यात मोठ्या संख्येने कोकणवासीय राहतात. मात्र तेथून एकही रेल्वेगाडी नसल्याने गैरसोय होणार आहे. त्यांना कोकणात जाण्यासाठी ठाणे, दादर व पनवेल स्टेशन गाठावे लागते. परिणामी त्यांना संपूर्ण साहित्य जमा करून लोकल किंवा इतर पर्यायी मार्गाने प्रवास करून इच्छित स्थानक गाठावे लागते. यात त्यांची चांगलीच तारांबळ उडते.



Source link