Ganesh Visarjan 2023 : बाप्पांच्या विसर्जनाला समुद्रकिनारी जात असाल तर रहा सावधान, BMC कडून मार्गदर्शक सूचना जारी

0
18
Ganesh Visarjan 2023 : बाप्पांच्या विसर्जनाला समुद्रकिनारी जात असाल तर रहा सावधान, BMC कडून मार्गदर्शक सूचना जारी


यानंतर मुंबई पालिकेकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक इकबाल सिंह चहल,अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिल्या आहेत. गणेश विसर्जनादरम्यान ‘ब्लू बटन जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीच्या माशांच्या दंशापासून बचाव तसेच घ्यावयाच्या काळजीसंदर्भात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यासोबतच गणेशमूर्ती विसर्जनस्थळी समन्वयात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश ‘डी’, ‘जी उत्तर’, ‘के पश्चिम’, ‘पी उत्तर’ आणि ‘आर मध्य’ या विभागांच्या सहाय्यक आयुक्तांना आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आले आहेत.



Source link