
फलटण तालुका : कोळकी ग्रामपंचायत सदस्य गणेश दिनकर शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, अल्पावधीतच त्यांनी भाजपला रामराम ठोकत पुन्हा राजे गटाची वाट धरली आहे. या प्रवेशामुळे कोळकी ग्रामपंचायतीत भाजपमधून बाहेर पडून राजे गटात येण्यास सुरुवात झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत गणेश शिंदे यांनी राजे गटात घरवापसी केली. यावेळी डॉ. बाळासाहेब शेंडे, दत्तोपंत अण्णा शिंदे, राजेंद्र नाळे (चेअरमन, विविध कार्यकारी सोसायटी कोळकी), उपसरपंच डॉ. अशोक नाळे, सरपंच विक्रम भैया पखाले, अनिल कोरडे, दत्तात्रय नाळे, नवनाथ दंडिले तसेच कोळकीतील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
गणेश शिंदे यांच्या या निर्णयामुळे आगामी राजकीय समीकरणांमध्ये राजे गटाची ताकद वाढणार असल्याचे स्थानिक स्तरावर बोलले जात आहे.








