[ad_1]
मागील भागांमध्ये आपल्याला सरळ साध्या चिकूला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढणारी हनी पाहिली. हनीच्या ट्रॅपमध्ये अडकलेल्या चिकूला किडनॅप करण्याचे प्लॅनिंग होत असतानाच त्यात अनेकांचे गेम होत आहेत. आता हे किडनॅपिंग का होत आहे? आणि या किडनॅपिंगच्या जाळ्यात कोण कोण अडकणार? हे येत्या शुक्रवारी म्हणजेच ९ जून रोजी प्रदर्शित झालेल्या भागांमध्ये पाहायला मिळणार आहे. प्लॅनेट मराठी ओरिजनल्स, दि फिल्म क्लिक स्टुडिओज निर्मित, संतोष कोल्हे दिग्दर्शित या वेबसीरिजमध्ये चैतन्य सरदेशपांडे, पूजा कातुर्डे, प्रणव रावराणे, उपेंद्र लिमये, नम्रता संभेराव, समीर पाटील, दिगंबर नाईक, सविता मालपेकर, अंकुर वाडवे, मीरा सारंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
[ad_2]
Source link
