
गगनयान मोहिमेची पहिली चाचणी आज सकाळी साडेसात वाजता होणार होती. परंतु, खराब हवामानामुळे दोन वेळा चाचणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. यानंतर सकाळी ८ वाजता प्रेक्षेपण करण्यात येणार होते. मात्र, हवामानात सुधारणा न झाल्याने पुन्हा वेळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी सकाळी ८.४५ वाजता प्रेक्षपणाची वेळ निवडण्यात आली. मात्र, अखिरेस गगनयान मोहिमेची पहिली चाचणी स्थगित करण्यात आली.








