Wednesday, September 16, 2026
HomeUncategorizedफलटण तालुक्याची स्वप्नपूर्ती व माझी वचनपूर्ती खा.रणजितसिंह; देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निरा...

फलटण तालुक्याची स्वप्नपूर्ती व माझी वचनपूर्ती खा.रणजितसिंह; देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते निरा देवघर कालवा व इतर कामाचे भूमिपूजन

फलटण :तालुक्याच्या व माढा लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासामधला सुवर्ण अक्षरात लिहिणारा कार्यक्रम बुधवार दिनांक १७ जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता होत आहे. निरा देवघर कालव्याच्या कामाचे भूमिपूजन तसेच धोम बलकवडी जोड कालवा, बारामती रेल्वे, नाईकबोमवाडी एमआयडीसी भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री शंभूराज देसाई तसेच सातारा व सोलापूर जिल्ह्यातील सर्व खासदार व आमदार यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत असल्याचे सांगतानाच, फलटण तालुक्याची स्वप्नपूर्ती व लोकसभेला दिलेल्या शब्दांची माझी वचनपूर्ती दि.१७ जानेवारी रोजी पूर्ण होत असल्याचे माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

फलटण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर बोलत होते. या प्रसंगी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, युवनेते अभिजित नाईक निंबाळकर, फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख सचिन कांबळे, माजी नगरसेवक अशोकराव जाधव, सचिन अहिवळे उपस्थित होते.

पुढे बोलताना खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले, माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी पाहिलेले स्वप्न आता सत्यात उतरत आहे. निरा-देवघर साठी त्यांनी केलेला संघर्ष, फलटण बारामती रेल्वेसाठी केलेला संघर्ष त्यांच्या मृत्यूनंतर पूर्ण होत आहे. हिंदुराव नाईक निंबाळकर यांची इच्छा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केली आहे. धोम बलकवडी कालव्याचे तीन ते चार महिने मिळणारे पाणी आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नामुळे बारमाही होणार आहे. धोम बलकवडी कालवा जोड प्रकल्पाला तसेच निरादेवघर प्रकल्पाला, फलटण बारामती रेल्वे प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर पूर्व भागातील लोकांना रोजगार मिळण्यासाठी नाईकबोमवाडी येथे एमआयडीसीची स्थापना आपण करण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी होत असून, त्याचेही भूमिपूजन १७ जानेवारी रोजी होत आहे. लवकरच नाईकबोमवाडी एमआयडीसी येथे वाहनांचा प्रकल्प सुरू होणार आहे. फलटण तालुक्याची स्वप्नपूर्ती व लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मी दिलेल्या शब्दांची वचनपूर्ती होत आहे याचा मला मनस्वी आनंद होत असल्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट करून, दिनांक १७ जानेवारी रोजी यशवंतराव चव्हाण हायस्कूल फलटण येथे होणाऱ्या कार्यक्रमासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments