
व्हायरल व्हिडिओनुसार, एका शॉपिंग मॉलमध्ये अनोखा गेम सुरू होता. त्यामध्ये जो गेम जिंकेल त्याला आयफोन १५ बक्षीस म्हणून देण्यात येणार होता. शाळा आणि महाविद्यालयातील तरुणींनी या स्पर्धेत भाग घेण्यास सुरुवात केली. जी तरुणी टक्कल करेल त्याला आयफोन १५ देण्यात येणार, अशी ती स्पर्धा होती. केस काढावे लागणार असल्याने अनेकांनी या स्पर्धेतून माघार घेण्यास सुरुवात केली. त्यातच गर्दीतून एक सुंदर तरुणी बाहेर आली आणि तिने आयफोनसाठी टक्कल करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मॉलमध्ये तरुणीचं मुंडन करण्यास सुरुवात झाली. परंतु केस कापले जात असतानाच तरुणी ढसाढसा रडायला लागली. या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.








