फलटण:माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत फलटण नगर परिषदेच्या माजी उपनगराध्यक्षा रत्नमाला बेडके व त्यांचे पती माजी नगरसेवक भरत बेडके व अजिंक्य बेडके यांना भाजप पक्षात प्रवेश केला आहे . .
रत्नमाला बेडके यांनी फलटण नगर पालिकेमध्ये उपनगराध्यक्षा पदी व भरत बेडके यांना नगरसेवक म्हणून दहा वर्ष काम पाहिले होते . खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची फलटण शहरामध्ये मोठी राजकीय ताकद वाढली आहे ,बेडके यांच्या भाजप प्रवेशामुळे .
भाजपामध्ये पक्षप्रवेशाचे कारण सांगताना भरत बेडके म्हणाले, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी त्यांना भेटलेल्या खासदार पदाचा फायदा त्यांनी फक्त सर्वसामान्य जनतेसाठी उपयुक्त होईल असाच केला. त्यांनी अनेक वर्ष रखडलेले शहरातील व तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. फलटण शहरातील अनेक समस्या सोडण्यासाठी त्यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिला आहे. तसेच फलटण तालुक्याला लागलेला दुष्काळी हा कलंक पुसण्यासाठी त्यांनी निरा-देवधर प्रकल्प मंजूर करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. धोम-बलकवडी कालवा चारमाही वरून बारमाही केला. फलटण-लोणंद, फलटण-बारामती, फलटण-पंढरपूर रेल्वे मंजूर करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. फलटण शहरात व तालुक्यात रस्त्यांचे जाळे निर्माण केले. इतकेच नाही तर त्यांनी फलटण साठी आरटीओ ऑफिस ची मंजुरी घेऊन फलटणची वेगळी ओळख निर्माण केली. फलटण साठी जिल्हा न्यायालय मंजूर केले, तरुणांसाठी दुसरी नवीन एमआयडीसी मंजूर केली असे अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावल्यामुळे मी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व मा. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पुढील राजकीय वाटचाल करण्याचा निर्णय घेतला आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व मा. समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहर व तालुक्याचा येणाऱ्या काळात अतिशय चांगला व नियोजनबद्ध विकास होईल असा मला विश्वास आहे.
भविष्यात श्री. भरत बेडके यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात येईल आणि याच पद्धतीने भविष्यात अनेक मान्यवरांचे भाजपामध्ये प्रवेश होताना दिसतील असे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पक्षप्रवेशावेळी सांगितले.