
मयुरी कांगोने ९०च्या दशकात आपल्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. १९९५मध्ये ती पहिल्यांदा सईद मिर्झाच्या ‘नसीब’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर दिसली. महेश भट्ट यांच्या ‘पापा कहते हैं’ या चित्रपटातून मयुरीला तुफान प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटातील ‘घर से निकलते ही, कुछ दूर चलते ही’ हे गाणे सुपरहिट ठरले होते. या चित्रपटात मयुरीसोबत अभिनेता जुगल हंसराज झळकला होता. यानंतर मयुरीने बॉबी देओल आणि राणी मुखर्जीसोबत ‘बादल’, सैफ अली खान आणि करीना कपूरसोबत ‘कुर्बान’ आणि संजय दत्त, शिल्पा शेट्टी, जॅकी श्रॉफसोबत ‘जंग’ या चित्रपटात काम केले होते. २००१मध्ये ‘जीतेंगे हम’ या चित्रपटात ती शेवटची झळकली होती.







