
मुंबईत मालाड या उपनगरात एका तीन मजली शॉपिग मॉलमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत किमान १० ते १२ नागरिक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मालाड परिसरात जैन मंदिर रोडवरील Acme शॉपिंग सेंटरमध्ये संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशामन दलाने दिली. अग्निशामक दलाच्या चार गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे.







