Fire Due TO AC | गर्मीपासून वाचण्यासाठी घरात लावला एसी, सगळे झोपेत असताना एसीनं घेतला पेट; कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
18
Fire Due TO AC | गर्मीपासून वाचण्यासाठी घरात लावला एसी, सगळे झोपेत असताना एसीनं घेतला पेट; कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू! | Navarashtra (नवराष्ट्र)


गर्मीपासून वाचण्यासाठी घरात लावला एसी, सगळे झोपेत असताना एसीनं घेतला पेट; कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू!

गुजरातमधील द्वारका जिल्ह्यातील घराचा एसी जास्त तापल्याने आग लागली. आग घरभर पसरली आणि एकाच कुटुंबातील चार जणांचा गुदमरून मृत्यू झाला.

घरी एसी (air conditioner) लावून झोपणाऱ्यांनो जरा सावधान! कारण गर्मीपासून बचाव करण्यासाठी घरात एसी लावणं तुम्हाला महागात पडू शकतं. जीवाची काहीली कमी करणारा हा एसी जीवही घेऊ शकतो. त्याचं कारण म्हणजे या एसीमुळे एकाच कुटुंबातील चार जणांना जीव गमवावा लागल्याची घटना गुजरातमध्ये घडली आहे. गुजरातमधील देवभूमी द्वारका जिल्ह्यातील द्वारका शहरात घराचा एसी जास्त तापल्याने आग लागली. आग घरभर पसरली आणि एकाच कुटुंबातील चार जणांचा गुदमरून मृत्यू झाला. आणखी एका व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अथक प्रयत्नानंतर त्यांनी आग आटोक्यात आणली. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे.

हे सुद्धा वाचा

नेमका प्रकार काय

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील देवभूमी द्वारका जिल्ह्यात घराला लागलेल्या आगीत एका मुलासह एकाच कुटुंबातील चार जणांचा गुदमरून मृत्यू झाला. पवन उपाध्याय (३९), त्यांची पत्नी तिथी (२९), मुलगी ध्यान आणि आई भवानीबेन (६९) अशी मृतांची नावे आहेत. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.






Source link