
या चित्रपटाविषयी बोलताना सोहम शाह म्हणाला की, ‘हा चित्रपट बनवताना मी आर्थिकदृष्ट्या खचून गेलो होतो. या ७ वर्षांत मला माझे घरही विकावे लागले होते. त्यानंतर आणखी काही मालमत्ता विकावी लागली. शेवटी मी माझी कारही विकली. मी लहान असताना राज कपूर यांनी चित्रपट बनवण्यासाठी घर विकल्याचे अनेकदा ऐकले होते. पूर्वी माझा या गोष्टींवर विश्वास नव्हता. पण, आता मला विश्वास आहे की, असे प्रत्यक्षात आताही होऊ शकते.’ ‘तुंबाड’ हा चित्रपट १२ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता. राही बर्वे आणि आनंद गांधी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.








