Filmfare OTT Awards 2023: एक-दोन नव्हे ‘या’ वेब सीरिजने पटकावले ९ पुरस्कार! पाहा विजेत्यांची यादी…

0
17
Filmfare OTT Awards 2023: एक-दोन नव्हे ‘या’ वेब सीरिजने पटकावले ९ पुरस्कार! पाहा विजेत्यांची यादी…


Filmfare OTT Awards 2023 Winner List: ‘फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स २०२३’ हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला आहे. यंदाच्या या पुरस्कार सोहळ्यात वेब सीरिजचा चांगलाच दबदबा पाहायला मिळाला आहे. रविवारी (२७ नोव्हेंबर) पार पडलेल्या या भव्य सोहळ्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेल्या चित्रपटांना आणि वेब सीरिजना वेगवेगळ्या विभांगामध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात यंदा अॅमेझॉन प्राईम व्हिडीओच्या एका वेब सीरिजने आपला जलवा दाखवला आहे. या सीरिजमध्ये अभिनेता अपारशक्ती खुराणा आणि अभिनेत्री वामिका गब्बी हे मुख्य भूमिकेत झळकले होते. या वेब सीरिजमध्ये स्वातंत्र्यपूर्व भारताची कथा दाखवण्यात आली आहे. अपारशक्ती खुराणा आणि वामिका गब्बी यांच्या ‘जुबली’ या वेब सीरिजने फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स २०२३मध्ये तब्बल ९ पुरस्कार पटकावले आहेत. चला तर पाहूया यंदाच्या ‘फिल्मफेअर ओटीटी अवॉर्ड्स २०२३’च्या विजेत्यांची यादी…



Source link