Feroz Khan Death Anniversary : बॉलिवूडच्या ‘आरडीएक्स’वर होती पाकिस्तानात बंदी; कारण ऐकून वाटेल अभिमान!

0
11
Feroz Khan Death Anniversary :  बॉलिवूडच्या ‘आरडीएक्स’वर होती पाकिस्तानात बंदी; कारण ऐकून वाटेल अभिमान!


अभिनेते फिरोज खान यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत चॉकलेट हिरोपासून ते भयानक खलनायकापर्यंतच्या सगळ्याच भूमिका साकारल्या होत्या. एकीकडे भारतासह जगभरात त्यांचे चित्रपट गाजत होते. मात्र, या दरम्यान पाकिस्तानात त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. २००६मध्ये अभिनेते फिरोज खान ‘ताजमहाल’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पाकिस्तानात गेले होते. मात्र, पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांनी त्यांना ब्लॅक टाकल्याचे म्हटले जाते. फिरोज खान यांनी एका पाकिस्तानी गायकावर टीका करण्यासोबतच, पाकिस्तानलाही खडे बोल सुनावले होते. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे, असे म्हणत अभिनेते फिरोज खान यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे पाकिस्तानात त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती.



Source link