Farmer Death | भाजपच्या प्रचारातच शेतकऱ्याचा मृत्यू; आंदोलकांनी अडवली उमेदवाराची गाडी | Navarashtra (नवराष्ट्र)

0
14
Farmer Death  | भाजपच्या प्रचारातच शेतकऱ्याचा मृत्यू; आंदोलकांनी अडवली उमेदवाराची गाडी | Navarashtra (नवराष्ट्र)


भाजपच्या प्रचारातच शेतकऱ्याचा मृत्यू; आंदोलकांनी अडवली उमेदवाराची गाडी

पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात एक जून रोजी मतदान होणार आहे. राजकीय पक्षांच्या प्रचारामुळे सध्या राज्यात राजकीय तापमान वाढले आहे. शेतकरी आंदोलनाचा परिणाम पंजाबमधील निवडणूक प्रचारावरही दिसून येत आहे.

पतियाळा : पंजाबमध्ये लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यात एक जून रोजी मतदान होणार आहे. राजकीय पक्षांच्या प्रचारामुळे सध्या राज्यात राजकीय तापमान वाढले आहे. शेतकरी आंदोलनाचा परिणाम पंजाबमधील निवडणूक प्रचारावरही दिसून येत आहे. अनेक ठिकाणी राजकीय पक्षांच्या उमेदवारांना शेतकरी आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे.

पतियाळा येथे अशीच एक घटना घडली. जेव्हा एका शेतकरी संघटनेशी संबंधित काही लोकांनी प्रचारासाठी राजपुराच्या सेहरा भागात पोहोचलेल्या भाजप उमेदवार प्रनीत कौर यांच्या विरोधात आंदोलन करण्यास सुरुवात केली.






Source link