फलटण-कोरेगाव: दिपकराव चव्हाण यांच्या मताधिकाऱ्याबद्दल महाविकास आघाडीचे आभार व्यक्त

0
1
फलटण-कोरेगाव: दिपकराव चव्हाण यांच्या मताधिकाऱ्याबद्दल महाविकास आघाडीचे आभार व्यक्त

फलटण :- फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्र पवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तसेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकराव प्रल्हाद चव्हाण यांनी १ लाख २ हजार २४१ इतके मते मिळवत मतदारांचा विश्वास संपादन केला.

महाविकास आघाडीचे सर्व नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, युवक-युवती, व स्थानिक नागरिकांनी अहोरात्र मेहनत घेत चव्हाण यांना मिळालेल्या प्रचंड मताधिक्याची जबाबदारी पार पाडली.

फलटण बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी मतदारांचे आभार मानले. त्यांनी असेही सांगितले की, “एक पराभव आमच्या जिद्दीवर परिणाम करणार नाही. नव्या उमेदीने आणि जोमाने फलटण-कोरेगावच्या जनतेच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”

महाविकास आघाडीच्या या नेतृत्वाने राजकीय चळवळ आणखी मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.