
मतदानाची प्रक्रिया एकदा पार पडल्यानंतर सर्वांना उत्सुकता असते ती एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतात त्याची. एक्झिट पोलसाठी विविध मिडिया कंपन्या आपआपले प्रतिनिधी काही ठराविक, निवडक मतदारसंघांमध्ये आपले प्रतिनिधी पाठवून लोकांचा कौल जाणून घेत असतात. मतदान करून आलेल्या व्यक्तीला काही प्रश्न विचारले जातात. त्या व्यक्तीने कुणाला मतदान केले याचा अंदाज बांधला जातो. हा सँपल सर्वे असतो. परंतु अनेकदा हे सर्वे तंतोतं जुडत नाही.




