Excuse to Helmet : हेल्मेट न घालण्यासाठी ‘हे’ कारण ऐकून पोलीसही चक्रावले… थेट ऑस्करसाठी केली शिफारस

0
17
Excuse to Helmet : हेल्मेट न घालण्यासाठी ‘हे’ कारण ऐकून पोलीसही चक्रावले… थेट ऑस्करसाठी केली शिफारस


नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळावे यासाठी पोलीस दंडुक्यासोबतच इतरही विविध क्लुप्त्या आणि ट्रिक्सचा वापर करत असतात. रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी दिल्ली पोलिस सोशल मीडियावर विविध क्रिएटिव्ह असे व्हिडिओ आणि फोटो, मजेशीर कॅप्शनसह शेअर करत असतात. अशा पोस्टमुळे लोकांचे मनोरंजन तर होतेच शिवाय सर्वसामान्यांपर्यंत नियमांची माहिती पोचते. दिल्लीतील दुचाकी चालकांसाठी हेल्मेट वापरण्याविषयी मोहीम राबवत आहे. हेल्मेट न वापरण्यासाठी बाइकस्वार काय-काय बहाणे सांगतात, याची एक मजेशीर पोस्ट दिल्ली पोलिसांनी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. बाइकस्वारने केलेली बहाणा हा ऑस्कर पुरस्कारासाठी पाठवला जावा, अशी पोस्ट सध्या चर्चेचा विषय बनली आहे.



Source link