
फलटण प्रतिनिधी : फलटण नगरपरिषद निवडणुकीत वेगाने वाढत असलेल्या चुरशीला आणखी उधाण देत शिवसेना (शिंदे गट) व राजे गटाच्या संयुक्त प्रचार मोहिमेला आज नवे बळ मिळाले. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत बारसकर गल्ली, मरीमाता मंदिर आणि गणपती मंदिर श्रीफळ वाढवून या भव्य प्रचार फेरीची सुरुवात झाली.
नगरसेवक पदाचे उमेदवार विकास वसंत काकडे आणि स्मिता शहा यांनीही मतदारांशी थेट संवाद साधत विकासाभिमुख दृष्टीकोन मांडला. महिलांचा उत्स्फूर्त सहभाग, तरुणाईची जोशपूर्ण उपस्थिती आणि विविध समाजघटकांचा वाढता प्रतिसाद यामुळे संपूर्ण परिसरात निवडणुकीचा उत्साह दुमदुमला.
उमेदवारांनी सामाजिक न्याय, सर्वसमावेशक विकास आणि नागरिकांच्या प्रगतीसाठी कटिबद्ध भूमिका व्यक्त करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण केले.
प्रचारफेरीदरम्यान नागरिकांनी मांडलेल्या समस्या, स्थानिक सुविधांची गरज आणि विकासाच्या मागण्यांवर उमेदवारांनी आश्वासक चर्चा करत समाधानकारक तोडगे देण्याची ग्वाही दिली.
प्रचारफेरीदरम्यान मिळालेला प्रचंड जनसमर्थन पाहता, फलटण नगरपरिषद निवडणुकीची लढत आणखी तीव्र आणि रोचक होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.








