फलटण (साहस Times ) : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे फलटण तालुकाध्यक्ष, गुणवरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य, तसेच गेल्या तीन दशके पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असलेले ज्येष्ठ पत्रकार प्रा. रमेश आढाव सर यांचे १८ जुलै रोजी वयाच्या ६४व्या वर्षी नागपूर येथे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.
फलटण तालुका व सातारा जिल्ह्यात राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या अचानक निधनाने पत्रकारितेसह विविध क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्रा. आढाव सर यांना आदरांजली वाहण्यासाठी बुधवार, दि. २३ जुलै २०२५ रोजी दुपारी ३ वाजता महाराजा मंगल कार्यालय, फलटण येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला फलटण शहर व तालुक्यातील सर्व पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय व सर्वच समाजघटकांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.