Elvish Yadav FIR : तरुण तरुणींच्या पार्टीत सापाच्या विषाची व्यवस्था; बिग बॉस विजेता एल्विश यादव गोत्यात!

0
18
Elvish Yadav FIR : तरुण तरुणींच्या पार्टीत सापाच्या विषाची व्यवस्था; बिग बॉस विजेता एल्विश यादव गोत्यात!


रेव्ह पार्टीत सापाचे विष आणि परदेशी मुली पुरवल्याप्रकरणी अटक केलेल्या ५ आरोपींची चौकशी केली असता, त्यांनी एल्विश यादव या सगळ्याशी संबंधित असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या लोकांकडे ९ साप आणि सापाचे विष सापडले आहे. त्यापैकी ५ कोब्रा आणि उर्वरित विविध प्रजातीचे साप आहेत. याप्रकरणी आम्ही गुन्हा दाखल केला असून, त्यात एल्विश यादवचे नाव असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मात्र, त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पकडलेले सगळे साप वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत.



Source link