Mumbai Pune Electric Bus : मुंबईत बेस्ट प्रशासनाकडून ई-बसेस धावत आहेत. त्याच धर्तीवर आता मुंबई-पुण्यासारख्या लांब पल्ल्याच्या मार्गावरही इलेक्ट्रीक बसेस धावणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रस्ते परिवहन व राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, केंद्र सरकार येत्या पाच वर्षात भारतातील सर्व शहरात आणि दिल्ली-शिमला, दिल्ली-चंदीगड तसंच मुंबई-पुणेसारख्या लांब मार्गांवर इलेक्ट्रिक बस सुरू करण्याची योजना आखत आहे.





