
फलटण : फलटण तालुक्यात सध्या रात्रीचे ड्रोन फिरत असल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे सदर ड्रोन चोरी कामी वापरत असल्याच्या कारणावरून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यासंदर्भात फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी सांगितले की अलीकडे ड्रोन हे फलटण नदीपट्ट्यातील गावाच्या वरती उडताना दिसत आहेत. सदरचे ड्रोन बारामती तालुक्यात अनेक गावांमध्ये दिसून आलेले आहेत. तसेच दौंड सुपा या भागात सुद्धा दिसून आलेले आहेत.
सदर बाबत आम्ही बारामती तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये आहोत. बहुतेक हा प्रकार बारामती तालुक्यातील काही गावांमधूनच होत आहे परंतु लाईट मुळे तो ड्रोन आपल्या भागात सुद्धा दिसून येत आहेत. बारामती तालुक्यात ड्रोन शोधण्यासाठी एक खास पथक तयार करण्यात आलेले आहे त्यांच्याही आम्ही संपर्कात आहोत. सदर बाबत रात्रीची चार्टर्ड प्लेन फिरतात हे खरे आहे बारामतीला या विमानाचे ट्रेनिंग सेंटर आहेते सुद्धा लाईट मुळे उंचावर असताना ड्रोन सारखेच दिसतात.
जास्त खोल माहिती काढले असता आता अमेझॉन फ्लिपकार्ट यावर सुद्धा ड्रोन खरेदी केले जाऊ शकतात व अनेक लोकांनी ऑनलाइन ड्रोन खरेदी केलेले आहेत. सदर ड्रोन हे फोटोग्राफीसाठी किंवा सर्वेसाठी वापरले जात आहेत. सदर बाबत अधिकृत माहिती काढण्याचे कामकाज सुरू आहे.
परंतु सदरचे ड्रोन हे चोरीसाठी वापरतात ही बातमी अफवा आहे. ड्रोन ने सर्वेक्षण करून रात्रीच्या वेळेस घरामधील काय सामान आहे हे पाहणे अशक्य आहे.
त्यामुळे लोकांना फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या प्रशास तर्फे विनंती करण्यात येत आहे की कोणीही घाबरून जाऊ नये व आपवेतून कोणालाही मारहाण करू नये किंवा संशयित मिळाला तर व्यवस्थित चौकशी करावी.
रात्रीच्या वेळेस खोडसाळ पणाने हे ड्रोन उडवत असावेत.
याबाबत आम्ही सखोल माहिती घेत आहोत आपल्या गावात किंवा परिसरात कोणाला याबाबतीत जर काही माहिती असल्यास पोलीस प्रशासनास संपर्क करावा परंतु सर्व जनतेला विनंती करण्यात येत आहे कोणीही घाबरून जाऊ नये.
इंटरनेटवर माहिती घेतली असता परदेशात सुद्धा असे प्रकारचे खोडसळ प्रकार झालेले आहेत.
फलटण ग्रामीण पोलिस चे स्टाफ मोटरसाइकिल वर सादर भागात गस्त करत आहेत
आपले भागात चार पाच किलोमीटर परिसरात असणारे ड्रोन धारकाची नावे ९८२३५६२२५५ नंबरला व्हॉट ऍप करावेही विनंती आम्ही वेरफाइ करू







