डॉ. पवन मल्हारी सोनवणे यांना सुशिक्षित चेहरा म्हणून प्रभाग क्रमांक ४ ( अ ) मधून जनतेची पसंती.

0
28
डॉ. पवन मल्हारी सोनवणे यांना सुशिक्षित चेहरा म्हणून प्रभाग क्रमांक ४ ( अ ) मधून जनतेची पसंती.

पुणे : यंदाची निवडणूक महाराष्ट्रातील अनेक सुशिक्षित चेहऱ्यांनी रंगली जाणार असे दिसत आहे. महाराष्ट्रातल्या जवळपास सगळ्याच महानगरपालिकेतून अनेक सुशिक्षित चेहरे, महानगरपालिकेच्या दालनात नागरिकांचे प्रतिनिधित्व करणार असल्याची दाट शक्यता आहे.

अश्याच एका सुशिक्षित चेहऱ्याची चर्चा पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ ( अ ) मधून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ.पवन मल्हारी सोनवणे यांच्या अनुषंगाने रंगताना दिसत आहे.

स्थानिक नागरिकांसोबत असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे सबंध आणि गेली अनेक वर्ष आपल्या डॉक्टरी पेशासोबतच त्यांनी जपलेली सामाजिक कार्याची बांधिलकी नागरिकांना आपलीशी वाटू लागली आहे. आणि सध्यातरी जनतेच्या मनाचा कौल हा डॉ.पवन सोनवणे यांच्याकडे झुकलेला दिसत आहे.

आपल्या प्रामाणिक सामाजिक कार्याच्या विश्वासावर आणि बदलत्या युगाच्या आधुनिकतेच्या तत्वावर आपल्या माणसांच्या विकासाचे ध्येय घेऊन, निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या डॉ.पवन यांना जनतेची पसंती तर मिळत आहेच, पण मतांच्या रुपात त्यांच्या नावाची किती जोरात शिट्टी वाजणार हे पाहणे त्याहुनी जास्त महत्वाचे आहे.