Monday, September 14, 2026
Homeसाताराडॉ. महेश बर्वे यांचे ‘निरगाठ’ पुस्तक प्रकाशित - पर्यावरण व साहित्यातील योगदानाला...

डॉ. महेश बर्वे यांचे ‘निरगाठ’ पुस्तक प्रकाशित – पर्यावरण व साहित्यातील योगदानाला मान्यता

फलटण प्रतिनिधी – “पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी वृक्षारोपण मोहिमेसह साहित्यातील योगदानाची महत्त्वाची जबाबदारी उचलणारे डॉ. महेश बर्वे हे फक्त एक निष्णात डॉक्टरच नाहीत, तर सर्जनशील लेखकही आहेत,” असे गौरवोद्गार फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी काढले.

डॉ. महेश बर्वे लिखित ‘निरगाठ’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा फलटण येथील डॉ. जोशी हॉस्पिटलच्या सभागृहात श्रीमंत संजीवराजे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रमुख उपस्थितांचे विचार

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर: “मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला असला तरी तिचे संवर्धन व प्रसार होणे आवश्यक आहे. डॉ. बर्वे यांच्या ‘निरगाठ’मध्ये विविध विचारांनी भरलेले लिखाण वाचकांना नक्कीच प्रोत्साहित करेल.”

प्राचार्य रवींद्र येवले: “सोप्या भाषेत विचार मांडण्याची शैली वाचकांना वेगळ्या प्रकारचे बळ देते.”

डॉ. प्रसाद जोशी: “डॉ. बर्वे हे निष्णात डॉक्टर असून निसर्गप्रेमी, लेखक व फोटोग्राफर यासारख्या विविध गुणांनी युक्त आहेत. ‘निरगाठ’ हे पुस्तक वाचनीय आणि प्रेरणादायी आहे.”

निलीमा दाते: “पर्यावरण संवर्धनात महत्त्वाची भूमिका बजावतानाच अनुभवांना पुस्तकातून व्यक्त करण्याची कला डॉ. बर्वे यांच्यात आहे.”

डॉ. महेश बर्वे यांची भूमिका
डॉ. बर्वे म्हणाले, “‘निरगाठ’ हे पुस्तक केवळ वैद्यकीय किंवा सामाजिक गाठींबद्दल नाही, तर विचारांच्या गाठी सुटवण्याचा एक प्रयत्न आहे. साधक-बाधक विचारांना समर्पकपणे मांडण्याचा हा उपक्रम आहे.”

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन बकुळ पराडकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. प्राची बर्वे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात शुभांगी बोबडे यांच्या ईशस्तवनाने तर समारोप पसायदानाने झाला.

उपस्थित मान्यवर
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे फलटण शाखा अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, डॉ. जे. टी. पोळ, साहित्यिक सुरेश शिंदे यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments