
भाजपने लोकसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यामध्ये काही जणांचे तिकीट कापण्यात आले. परंतु, आता एकामागोमाग एक भाजपचे खासदार आणि नेते थेट राजकारणापासूनच निवृत्ती घेत आहेत. दिल्लीतील चांदणी चौक लोकसभा मतदारसंघातून माजी आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांनी थेट राजकारणातून निवृत्ती जाहीर केली.
Health Minister Dr. Harsh Vardhan : भाजप नेते एकामागोमाग एक भाजप नेते राजकारणापासूनच फारकत घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीमधील चांदणी चौकचे खासदार आणि भाजपाचे वरिष्ठ नेते डॉ. हर्षवर्धन यांनी राजकारणाला राम राम ठोकून निवृत्ती जाहीर केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने त्यांचे तिकीट कापल्यानंतर त्यांनी हा निर्णय जाहीर केला. शनिवारी भाजपाने दिल्लीतील पाच लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यामध्ये चांदणी चौक येथून प्रवीण खंडेलवाल यांना तिकीट देण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्य आणि पर्यावरण मंत्री म्हणून काम केले










