
Dombivli Massage Parlor Sex Racket Busted: डोंबिवली येथील एमआयडी भागात आर्किनिया इमारतीत मसाज पार्लरच्या नावाने सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पदार्फाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी व्यवस्थापकाला अटक केली आहे. तर, मालकाचा पोलीस शोध घेत आहेत. या पार्लरमधील पाच तरूणींची सुटका केली. हा प्रकार किती दिवसांपासून सुरू होता. आतापर्यंत किती तरूणींना या पार्लरमध्ये आणले गेले, याचा पोलीस तपास करीत आहेत.







