Diwali 2023 | केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची दिवाळी भेट, मिळणार ‘एवढा’ बोनस! | Navarashtra (नवराष्ट्र)

0
17
Diwali 2023 | केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची दिवाळी भेट, मिळणार ‘एवढा’ बोनस! | Navarashtra (नवराष्ट्र)


diwali bonus

सणासुदीसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठी भेट मिळाली आहे. केंद्र सरकारने मंगळवारी 2022-23 या वर्षासाठी बिगरराजपत्रित गट B आणि गट C कर्मचार्‍यांसाठी नॉन-प्रॉडक्शन लिंक्ड बोनस जाहीर केला.

सणासुदीसाठी केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारकडून मोठी भेट मिळाली आहे. केंद्र सरकारने मंगळवारी 2022-23 या वर्षासाठी बिगरराजपत्रित गट B आणि गट C कर्मचार्‍यांसाठी नॉन-प्रॉडक्शन लिंक्ड बोनस (Diwali Bonus) जाहीर केला. यामध्ये गट क आणि ब गटातील अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनस म्हणून एक महिन्याच्या पगाराएवढी रक्कम दिली जाते. वित्त मंत्रालयाने मंगळवारी 2022-23 साठी अराजपत्रित केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 7,000 रुपयांचा बोनस जाहीर केला. मंत्रालयाच्या कार्यालयीन निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. या दिवशी होऊ शकतो डीए वाढीचा निर्णय, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात एवढी वाढ होणार आहे.

हे सुद्धा वाचा

दिवाळी बोनस जाहीर

निवेदनात असे म्हटले आहे की, हा बोनस अशा कर्मचाऱ्यांना दिला जाईल जे कोणत्याही ‘उत्पादकता लिंक्ड बोनस योजने’चा लाभ घेत नाहीत. वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाने मेमोरँडममध्ये म्हटले आहे की ‘नॉन-प्रॉडक्टिव्हिटी लिंक्ड बोनस’ (अॅड-हॉक बोनस) लेखा वर्ष 2022-23 साठी 30 दिवसांच्या मानधनाच्या बरोबरीने सर्व गट ‘क’ आणि केंद्र सरकारच्या गट ‘ब’ अराजपत्रित कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. बोनसचा लाभ केंद्रीय निमलष्करी दल आणि सशस्त्र दलातील पात्र कर्मचाऱ्यांनाही मिळेल. याशिवाय हंगामी कर्मचारीही याच्या कक्षेत येतात.






Source link