
सहाय्यक भूमिकांमधून लोकप्रियता मिळवलेल्या दिव्याने राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला आहे. दिव्याला २०१८मध्ये ‘इरादा’ या चित्रपटासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात तिने सहाय्यक भूमिका साकारली होती. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत नसीरुद्दीन शाह, अर्शद वारसी, शरद केळकर, सागरिका घाटगे या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.








