Tuesday, September 15, 2026
Homeसाताराफलटण तालुक्यात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर याच्या माध्यमातून१५०० सायकलचे वाटप

फलटण तालुक्यात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर याच्या माध्यमातून१५०० सायकलचे वाटप

फलटणःमाढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड . जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून फलटण शहरासह तालुक्यामधील सर्वसामान्य विद्यार्थिनींना आपल्या शाळेमध्ये व कॉलेजला जाण्यासाठी मोफत सायकलचे वाटप नुकतेच करण्यात आले आहे.

फलटण येथील सजाई गार्डन मंगल कार्यालयामध्ये आयोजित कार्यक्रमात सायकल वाटप करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे – पाटील, जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या ॲड जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले, पोलीस उपअधीक्षक राहुल धस, तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव, नगर परिषदेचे मुख्याधिकारी निखिल मोरे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फलटण शहरासह तालुक्यामधील ज्या विद्यार्थिनी शाळेपासून व कॉलेज पासून लांब पल्यावर राहत आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांना माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून मोफत सायकलचे वाटप करण्यात आले आहे. सायकल वाटपाचा हा प्रथम टप्पा असून असे अजून १० टप्पे फलटण शहर तालुक्यातील विद्यार्थिनींसाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे आयोजित करणार आहेत.

फलटण तालुक्यासोबतच माढा लोकसभा मतदारसंघांमधील माण व इतर तालुक्यामध्ये सुद्धा मोफत सायकलचे वाटप करण्यात येणार आहे. येत्या दोन दिवसामध्येच माण तालुक्यांमध्ये मोफत सायकल वाटपाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments