फलटण तालुक्यात भाजपमध्ये नाराजीचा भडका; निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप, निवडणुकीत मोठ्या उलथापालथीची शक्यता

0
34
फलटण तालुक्यात भाजपमध्ये नाराजीचा भडका; निष्ठावंतांना डावलल्याचा आरोप, निवडणुकीत मोठ्या उलथापालथीची शक्यता

फलटण – नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फलटण तालुक्यात भाजपच्या अंतर्गत राजकारणाला चांगलाच उधाण आले आहे. या निवडणुकीत पक्षातील अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारून नव्याने पक्षात दाखल झालेल्या कार्यकर्त्यांना तिकीट देण्यात आल्याने असंतोषाची लाट पसरली आहे. यामुळे भाजपच्या निर्णयप्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याचा थेट फटका निवडणूक निकालांवर बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सध्या भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर ‘इन्कमिंग’ सुरू असल्याने जुन्या व निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये बळावत आहे. याचे ठळक उदाहरण म्हणजे भाजपचे फलटण तालुकाध्यक्ष अमित रणवरे यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याची घटना. पक्षाने डावलल्यामुळे नाराज झालेल्या रणवरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, त्यामुळे सुरवडी गण आणि निंभोरे पंचकृषी परिसरात प्रचंड नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे.
या घडामोडींमुळे भाजपला या मतदारसंघात मोठा सेटबॅक बसण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. अमित रणवरे आपला अपक्ष अर्ज मागे घेणार की नाही, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल; मात्र सध्यातरी त्यांचा बंडखोर पवित्रा भाजपसाठी डोकेदुखी ठरत आहे.
याचबरोबर कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्यापासून निष्ठावंत असलेले कार्यकर्ते बाळासाहेब कदम यांचे चिरंजीव सिद्धिराज कदम यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. मात्र त्यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला की मुद्दाम अवैध करण्यात आला, याबाबत गिरवी गावात जोरदार चर्चा सुरू आहे. सिद्धिराज कदम यांच्या राजकारणाच्या सुरुवातीलाच असा अडथळा आणण्यामागे काही राजकीय डावपेच तर नाहीत ना, असा सवाल स्थानिक पातळीवर उपस्थित केला जात आहे. राजकारणात नव्याने प्रवेश करणाऱ्या तरुण नेतृत्वाला बाजूला सारण्याचा हा प्रयत्न असल्याची कुजबुजही ऐकू येत आहे.
जर भाजपने येत्या काळात नाराज निष्ठावंतांची समजूत काढली नाही, तर याचा मोठा फटका पक्षाला बसणार, यात कोणतीही शंका नाही. या परिस्थितीचा थेट फायदा शिवसेनेचे किरण साळुंखे पाटील, अमोल सस्ते आणि सह्याद्री कदम यांना होण्याची दाट शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.
एकंदरीत फलटण तालुक्यात भाजपच्या अंतर्गत नाराजीमुळे निवडणूक रणधुमाळी अधिकच रंगण्याची चिन्हे असून, येत्या काही दिवसांत घडणाऱ्या घडामोडी तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा देणार