Dipika Kakar: सावधान! असेही गंडवले जाऊ शकता; ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या अभिनेत्रीला बसला फटका

0
20
Dipika Kakar: सावधान! असेही गंडवले जाऊ शकता; ऑनलाईन शॉपिंग करणाऱ्या अभिनेत्रीला बसला फटका


या फ्रॉडबद्दल दीपिकाने सांगितले की, तिच्या घरी एक पार्सल आले होते, जे तिने घेतले होते आणि त्यासाठीचे पूर्ण पैसेही दिले होते. पण, नंतर कळले की ते पार्सल दीपिकाचे नव्हते. दीपिकाने सांगितले की, हे पार्सल आल्यानंतर असे अनेक पार्सल तिच्याकडे सातत्याने येऊ लागले. ३-४ दिवसांपूर्वी माझ्या घरी ‘मॅडम तुमची कॅश ऑन डिलिव्हरी आहे’ असे सांगून एकामागून एक पार्सल येऊ लागली. दीपिका म्हणाली, ‘मी खूप ऑनलाईन शॉपिंग करते. पण, हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. परंतु, घोटाळा उघडकीस आल्यानंतर आता असे पार्सल मिळणे बंद झाले.’ एक दोन वेळा तिच्याकडे ओटीपी मागूनही फ्रॉड करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, ती वेळीच सावध झाली.



Source link