
Diljit Dosanjh Concert Tickets Price: पंजाबी गायक आणि अभिनेता दिलजीत दोसांझची फॅन फॉलोइंग बरीच मजबूत आहे. त्याची गाणी देशातच नव्हे, तर परदेशातही चांगलीच पसंत केली जातात. दिलजीत केवळ त्याच्या आवाजाच्या जोरावर नाही, तर त्याच्या अभिनयाच्या जोरावर त्याच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. त्यांची गाणी ऐकण्यासाठी चाहते कोणतीही किंमत मोजायला तयार असतात. सध्या दिलजीत त्याच्या दिल इल्युमिनाटी इंडिया टूरमुळे चर्चेत आहे. व्हँकुव्हर, डलास, वॉशिंग्टन डीसी, शिकागो, लॉस एंजेलिसनंतर आता भारतात हा शो प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे.







