Friday, September 4, 2026
Homeफलटणधोम-बलकवडी उजवा कालवा : नऊ गावांसाठी बंदिस्त नलिका वितरण व्यवस्था; नाईकबोमवाडी येथे...

धोम-बलकवडी उजवा कालवा : नऊ गावांसाठी बंदिस्त नलिका वितरण व्यवस्था; नाईकबोमवाडी येथे रविवारी भूमिपूजन

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते भूमिपूजन; आमदार सचिन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोहळा

फलटण प्रतिनिधी : धोम-बलकवडी उजवा कालव्याच्या कि.मी. १२८ ते १४७ या टप्प्यातील नऊ गावांच्या सिंचन व पाणी वितरण व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या गावांसाठी बंदिस्त नलिका वितरण व्यवस्था उभारण्यात येणार असून, या महत्त्वाकांक्षी कामाचा भूमिपूजन सोहळा रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता मोजे नाईकबोमवाडी, ता. फलटण येथे आयोजित करण्यात आला आहे.

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन होणार असून, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सचिन पाटील राहणार आहेत. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली तसेच आमदार सचिन पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामाला गती मिळाल्याचे आयोजकांनी सांगितले.

दुधेबावीसह नऊ गावांना होणार लाभ

धोम-बलकवडी उजवा कालव्याच्या कि.मी. १२८ ते १४७ या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या बंदिस्त नलिका वितरण व्यवस्थेमध्ये दुधेबावी, मिरढे, नाईकबोमवाडी, वडले, शेरेशिंदेवाडी, बरड, कुरवली बुद्रुक, जावली आणि आंदरुड या नऊ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

या बंदिस्त नलिका वितरण व्यवस्थेमुळे संबंधित गावांतील पाणी वितरण व्यवस्था अधिक प्रभावी होण्यास मदत होणार असून ग्रामीण भागाच्या विकासाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

विविध मान्यवरांची प्रमुख उपस्थिती

भूमिपूजन सोहळ्यास ज्येष्ठ नेते प्रल्हाद साळुंखे-पाटील, फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर, युवा नेते अभिजित नाईक निंबाळकर, उद्योजक राम निंबाळकर, माजी जिल्हा परिषद सदस्या अॅड. जिजामाला नाईक निंबाळकर, फलटण पंचायत समितीच्या सभापती शिवांजली भोसले, सातारा जिल्हा बँकेचे संचालक शिवराजराजे खर्डेकर तसेच कृष्णा खोरे महामंडळाचे संचालक माणिकराव सोनवलकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

ग्रामस्थांना उपस्थित राहण्याचे आवाहन

या भूमिपूजन सोहळ्यास दुधेबावी, मिरढे, नाईकबोमवाडी, वडले, शेरेशिंदेवाडी, बरड, कुरवली बुद्रुक, जावली आणि आंदरुड या नऊ गावांसह परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध सामाजिक व सहकारी संस्थांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत हा भूमिपूजन सोहळा उत्साहात पार पडणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments