Dharmaveer 2 Poster: ‘साहेबां’च्या हिंदुत्वाची गोष्ट मोठ्या पडद्यावर उलगडणार; सुरू होणार ‘धर्मवीर २’चा प्रवास!

0
16
Dharmaveer 2 Poster: ‘साहेबां’च्या हिंदुत्वाची गोष्ट मोठ्या पडद्यावर उलगडणार; सुरू होणार ‘धर्मवीर २’चा प्रवास!


‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटातून स्वर्गीय आनंद दिघे यांचा जीवनप्रवास दाखवण्यात आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. यानंतरच ‘धर्मवीर २’ची घोषणा झाली होती. आता या चित्रपटाच्या प्रवासाचा शुभारंभ झाला आहे. नुकताच ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचा मुहूर्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे येथे करण्यात आला. या मुहूर्त सोहळ्याला चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक ,कलाकार, तंत्रज्ञ तसेच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. येत्या ९ डिसेंबरपासून ठाणे येथे या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. या सोहळ्यात ‘धर्मवीर २’ या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.



Source link