
स्वाती प्रशांत कस्तुरे यांनी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात धारशिव येथील नेहा संत यांना दोन वर्कचे ब्लाऊज शिवण्यासाठी दिले होते. या साठी त्यांनी त्यांना वेळ देखील दिली होती. तसेच कामाचे आगाऊ पैसे म्हणून त्यांनी एकूण ६ हजार ३०० रुपये बिलापैकी ३ हजार रुपये ॲडव्हान्स दिले. ठरलेल्या दिवशी स्वाती या नेहा संत यांच्याकडे जाऊन त्यांनी त्यांचे ब्लाऊज झाले की नाही या बाबत विचारणा केली. मात्र, त्यांना त्यानहे ब्लाऊज वेळेवर शिवून दिला नाही. फोन, मेसेजद्वारे पाठपुरावा केल्यानंतरही ब्लाऊज मिळाले नअसल्याने स्वाती कस्तुरे यांनी २८ एप्रिल २०२३ रोजी ॲड.प्रशांत कस्तुरे यांच्यामार्फत ग्राहक तक्रार निवारण मंचात तक्रार दाखल केली. या तक्रार अर्जावर वर्षभरानंतर सुनावणी झाली.