
आपल्या युक्तिवादाच्या समर्थनार्थ डॉ. वारुंजीकर यांनी बसवलिंगप्पा प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या १९६५ च्या निकालाचा आधार घेतला, ज्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले होते की, राष्ट्रपतींच्या आदेशात एखाद्या समुदायाला एकापेक्षा जास्त नावांनी ओळखले जात असेल तर त्याच्या वेगवेगळ्या नावांचा विशेष उल्लेख आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील धनगरांऐवजी ‘धनगड’ समाजाची नोंदणी करताना ‘टंकलेखनातील त्रुटी’ झाली, असे मानता येणार नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.






