
मुंबईत ते माध्यमांशी बोलत होते. अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा धर्मरावबाबा अत्राम यांनी नुकताच केला होता. त्यावरून या चर्चेला तोंड फुटलं होतं. त्याबाबत विचारलं असता फडणवीसांनी स्पष्ट भूमिका मांडली. ‘राजकारणात असलेल्या प्रत्येकाला कधी-ना-कधी संधी मिळते. अजितदादा हे त्यांच्या पक्षाचे मोठे नेते आहेत. पण आताचं वास्तव सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत, ते मुख्यमंत्री राहणार आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली आम्ही एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे जाणार आहेत. याबाबत मी स्पष्टपणे बोललो होतो. काही लोकांना ते समजत नाही,’ असा टोला फडणवीसांनी हाणला.



